मुंबई, दि.३ : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
००००
