• Mon. Jun 15th, 2026
    Jalna News : धान्य काढताना आक्रित घडलं, मशिनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा करुण अंत; घरचा कर्ता लेक गेल्यानं आईचा आक्रोश

    Jalna Death of a Young Farmer : जालना जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मळणी यंत्रात अडकून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    धान्याच्या मशिनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना तालुक्यातील कारला गावात एक दुर्दैवी घटना घडली असून मळणी यंत्रात अडकून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी 15 मार्च रोजी दुपारी ही घटना घडली असून शरद दत्तात्रय कोल्हे (वय 30) असं मृत तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, शरद कोल्हे हे आपल्या शेतात हरभऱ्याचे पीक काढण्याचे काम करत होते. मळणी यंत्राद्वारे प्रक्रिया सुरू असताना अचानक त्यांचा हात मशीनमध्ये अडकला. काही क्षणांतच ही दुर्घटना भीषण स्वरूपात परिवर्तित झाली आणि संपूर्ण शरीर यंत्रात ओढले गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या परिवाराने आरडाओरड केली. हे ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी व मळणी यंत्र चालकांनी तात्काळ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता, सदर घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
    Maharashtra TimesPune Accident : पुण्यात भीषण अपघात; भरधाव वाहनाचा टायर फुटला अन् नियंत्रण सुटलं, ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

    लेकरांचं पितृछत्र हरपलं

    घटनेची माहिती मिळताच, या हृदयद्रावक प्रसंगामुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शरद कोल्हे हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या एका मुलाचे वय अवघे तीन महिने असून मोठा मुलगा पाच वर्षांचा आहे. या घटनेची नोंद मोजपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेहाचं जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं.
    Maharashtra TimesCondom Price Surge : आखाती युद्धाचा छ. संभाजीनगरच्या कंडोम उत्पादनाला फटका, केमिकल महागल्याने किमती वाढण्याची चिन्हंया दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीकाम करताना आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करताना योग्य काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र, झालेल्या या घटनेमुळे या तरुण शेतकऱ्याचा संपूर्ण परिवार उघड्यावर पडला असून कारण हा शेतकरी एक कर्ता पुरुष होता. घरातला कर्ता पुरषच गमावल्याने या परिवारावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा