• Sun. Aug 9th, 2026

    Manmad News: अनेकांसाठी देवदूत ठरलेल्या तरुणावर काळाचा घाला; विशालचा इमारतीवरून पडून मृत्यू, समाजमन सुन्न!

    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: मनमाडसह विविध शहरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा, तसंच संकटात, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य, अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जात त्यांच्यासाठी जणू आधाराचा हात ठरणाऱ्या मनमाडच्या विशाल सुभाष राऊत या तरुणाचा मालेगावमधील मोती कॉर्नर येथे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आकस्मिक अपघाती मृत्यू झाला. इतरांसाठी जणू देवदूत ठरलेल्या या तरुणावर काळाने निर्घृणपणे घातलेला घाला सगळ्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला. त्याने दीडशेपेक्षा अधिक जणांना वेळीअवेळी मदत केल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

    आपल्या मदत कार्याने अनेकांचे प्राण वाचवणारा, रस्त्यातील अनेक जखमींना दवाखान्यात स्वतः दाखल करून त्यांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या या देवदूताचा काम सुरू असताना इमारतीवरून पडून जागीच मृत्यू झाला. दिलखुलास, मनमोकळा आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या विशालने अकस्मात जगाचा निरोप घेतला.

    विवेकानंदनगर भागात राहणाऱ्या विशाल राऊत याचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय आहे. या कामासाठी त्याला मनमाडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जावे लागे. मात्र, समाजाप्रती असलेली आस्था आणि आई-वडिलांचे संस्कार तसेच जवळच्या व्यक्तीला योग्य वेळी मदत न मिळाल्याने उपचारासाठी त्यांची झालेली ससेहोलपट यातून विशालच्या मनात रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करण्याचा विचार रुंजी घालू लागला. चांदवड, येवला येथे कामासाठी स्वतःचे चारचाकी वाहन घेऊन जाताना रस्त्यावर अपघात दिसला की गाडी थांबवून विशाल मदतीला धावायचा. रुग्णाला स्वतःच्या वाहनातून सरकारी वा खासगी दवाखान्यात घेऊन जायचा. जखमींची विचारपूस करत त्यांना धीर देऊन वेळप्रसंगी त्यांच्या नातेवाइकांना बोलवून, ते येईपर्यंत स्वतः रुग्णाजवळ थांबायचा. विशाल आपल्या अशा अघोषित मदत केंद्राद्वारे रुग्णासाठी देवदूत ठरायचा.

    समाजमन हादरले

    अनेक अपघातग्रस्तांना विशालने संकटात आधार देत, त्यांचा जीव वाचवल्याचे त्याचा मित्र, शिक्षक पंकज गांगुर्डे सांगतो. विशालचा अचानक अपघात झाला. परंतु, त्याला वाचवण्याची संधी कोणालाही मिळू शकली नाही. दुसऱ्यासाठी जीवन संजीवनी ठरलेला; परंतु स्वतःचा जीव वाचवू न शकलेल्या या ४६ वर्षीय तरुणाच्या जाण्याने मनमाडवर शोककळा पसरली आहे. विशालच्या मृत्यूने समाजमन हादरून गेले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed