• Thu. Jun 18th, 2026

    Nashik Water Cut : जून-जुलैत दर शनिवारी, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय

    Nashik Water Cut : जून-जुलैत दर शनिवारी, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय

    नाशिकमध्ये महापालिकेकडून पाणीकपातीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात अल निनोचा प्रभाव राहिल्यास दर दोन दिवसाआढ पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये अखेर येत्या शनिवारपासून पाणीकपातीचा निर्णय लागू होणार आहे. राज्यात पावसाला झालेला उशिर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने जून आणि जुलै या दोन महिन्यांसाठी सध्या तरी आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे. तसेच अल-निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या पत्रानंतर महापालिकेने पाणी कपातीचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.

    भारतीय हवामान विभागाने व्यकक्त केलेल्या अंदाजानुसार या वर्षी अल-निनो परीस्थितीचा प्रभाव राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील विविध धरणे जलाशय आणि इतर जलस्त्रोतांमधील उपलब्ध पाणी साठ्याचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा गरजांना सर्वोच्या प्राधान्य देणे आवश्यक असल्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती महापालिकेने प्रसिद्धीपत्रक जारी करत दिली आहे.

    नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वसाधारणपणे सरासरी दररोज 600 द.ल.लि. प्रतिदिन इतके कच्चे पाणी (Raw Water) गंगापूर धरण समुह आणि मुकणे धरण येथून उचलण्यात येते. त्यावर शहरातील सात ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण करुन 134 जलकुंभादवारे आणि सुमारे 2502 कि.मी. लांबीच्या जलवाहीन्यांमधून शहरात पाणी वितरीत करण्यात येते.

    एकुण आरक्षण 6400 – प्रत्यक्ष वापर 5133.99 = शिल्लक पाणी साठा 1266.01 दैनंदिन सरासरी 21.13 सदर नुसार शिल्लक पाणी साठा हा 60 दिवस पुरेल इतका शिल्लक आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत एकूण 78 दिवस असल्याने उपरोक्त प्रमाणे 18 दिवसांची तुट येत आहे. त्यानुसार जून महिन्यातील दोन शनिवार, जुलै महीन्यात 4 शनिवार आणि ऑगस्ट महीन्यात दोन दिवसाआड पाणी कपात करणे अनिवार्य असल्याने त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

    त्यानुसार नाशिक शहराचा यापुढील जून व जुलै महीन्यातील प्रत्येक शनिवार पाणी पुरवठा होणार नाही. ऑगस्ट महिन्यात दोन दिवसाआड म्हणजेच 1, 4, 7, 10, 13, 16, 19, 22, 25, 28 व 31 ऑगस्ट 2026 रोजी पाणी पुरवठा होणार नाही, यांची नागरीकांनी नोंद घ्यावी आणि नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे ही नम्र विनंती, असं महापालिकेने म्हटलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा