दरम्यान, ऋषिकेश सोनार यांच्या दीड वर्षांच्या बाळालाही मधमाशांनी चावल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसाद सोनार आणि अंश प्रसाद सोनार यांनाही मधमाशांनी चावले होते. मात्र सर्वांना सुरक्षितपणे दवाखान्यात पोहोचवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे किल्ले सिंहगड परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून पर्यटकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Dombivli News : डोंबिवलीच्या लेझीमला जागतिक दाद; 9,111 महिलांचा विश्वविक्रम, नारीशक्तीचा महिलादिनी इतिहास, गिनीजमध्ये नोंद
सिंहगड घाटात टेम्पो 150 फूट दरीत कोसळला; पाच जण बचावले, तिघे किरकोळ जखमी
स्नेहल निमगिरे, पुणे : सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर मालवाहू टेम्पो खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. कोंढणपूर मार्गे सिंहगड–डोणजे रस्त्यावर काल सायंकाळी हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पोमधील पाचही जणांचा बचाव झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाकूड वाहतूक करणारा टेम्पो घाटातील अवघड वळणावरून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली लोखंडी सुरक्षा जाळी तोडत टेम्पो सुमारे 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळला. अपघातावेळी टेम्पोमध्ये एकूण पाच जण होते. प्रसंगावधान राखत काही जणांनी वेळीच उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात तिघांना किरकोळ दुखापत झाली असून दोघे जण सुखरूप बचावले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Satara News: मुलीच्या लग्नाची स्वप्नं उरी, पण नियतीचा क्रूर खेळ; निर्माल्य टाकताना कृष्णा नदीत बुडून आईचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच सिंहगड वनविभागाचे परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले.
या मदतकार्यात वनरक्षक बळीराम वायकर, वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक, हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार संतोष तोडकर तसेच स्थानिक पोलीस पाटील निलेश चव्हाण, गणेश सपकाळ, कालिदास माताळे, गणेश आखाडे, संदीप कांबळे आणि गोटीराम बडे यांनी सहभाग घेतला.
