जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा मुंबईत पार पडला.या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण करत लाडक्या बहिणींचा सन्मान केला.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंच्या राज्यसभा उमेदवारीचा किस्सा सांगितला.तसंच कार्यकर्त्यांची शिवसेनेला असलेली साथ याचं उदाहरणही शिंदेंनी दिलं.दरम्यान एकनाथ शिंदे यांनी केंद्रातल्या मंत्री पदाबद्दल सांगताना खासदार श्रीकांत शिंदे यांचंही कौतुक केलं.