• Sat. Mar 7th, 2026
    Baramati Accident : खासगी कामासाठी निघाले, घरी परतताना चौकोनी कुटुंबावर काळाची झडप; आई-लेकीचा जागीच करुण अंत

    Baramati Accident : बारामती-पारवडी येथे काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    बारामती अपघात आई मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामती-पारवडी मार्गावर काल रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कोकणे हे पत्नी रूपाली कोकणे, पाच वर्षांची मुलगी सानवी आणि दोन वर्षांचा मुलगा यांच्यासह दुचाकीवरून बारामतीहून पारवडीकडे जात होते.

    आई-लेकीचा जागीच अंत

    दरम्यान, बारामती-कटफळ-पारवडी मार्गावर परीट वस्तीजवळ खडकीकडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पाच वर्षांची सानवी मयूर कोकणे व तिची आई रूपाली मयूर कोकणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मयूर कोकणे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
    Maharashtra TimesRohit Pawar: अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीच्या विमानतळाची रेकी? स्थानिकांच्या माहितीच्या आधारे रोहित पवारांचा दावा

    वाहन सोडून पलायन

    अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे बारामती-पारवडी मार्गावरील वाहतूक किती धोकादायक झाली आहे, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
    Maharashtra TimesPolice Recruitment: पोलिस होण्याऐवजी झाले चोर! मुंबईतील भरतीवेळी धावण्याच्या चाचणीत तरुणांकडून चलाखी; पण सीसीटीव्हीमुळे खेळ फसला

    ‘माझ्या मुलीला का त्रास देतो?’

    ‘माझ्या मुलीला त्रास का देतोस?’ असा सवाल करत संतापलेल्या वडिलांनी थेट कॅम्पसमध्ये जाऊन एका तरुणाला जाब विचारल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. शहरातील नामांकित एमआयटी ADT University कॅम्पसमध्ये आज गुरुवारी काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. डी.वाय.पाटीलमधील एक विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून संबंधित विद्यार्थिनीला सोशल मीडियावरून वारंवार मेसेज करत त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सततच्या या प्रकारामुळे वैतागलेल्या विद्यार्थिनीला अखेर ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर वडिलांनी संबंधित विद्यार्थ्याला कॉलेजमध्येच त्याला मारहाण केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा