• Fri. Mar 6th, 2026
    लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळलं, ऐन होळीला अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुळे दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर

    Satara Boy Death : चिमुरडा विघ्नेश दुचाकीवरून उतरून घरात जात असतानाच घराचे लोखंडी प्रवेशद्वार त्याच्या अंगावर कोसळले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. कराडमधील रिमांड होमच्या पाठीमागील एका कॉलनीत ऐन होळी दिवशी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. विघ्नेश वल्लभ मुळे, असं मृत चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी चिमुकल्यावर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. या हृदयद्रावक घटनेने मुळे कुटुंबासह संपूर्ण भोई समाजावर शोककळा पसरली आहे.

    नेमकं काय घडलं?

    कराड शहरातील भोई गल्लीत वल्लभ मुळे यांचा मासे पकडण्याच्या जाळी विक्रीचा व्यवसाय आहे. ते कुटुंबासह मलकापूरमधील रिमांड होम परिसरात राहतात. होळी सणादिवशी वल्लभ मुळे हे पत्नी व मुलासोबत होळी पूजनास भोई गल्लीत आले होते. तेथून ते मलकापुरातील आपल्या घरी गेले. मुलगा विघ्नेश दुचाकीवरून उतरून घरात जात असतानाच घराचे लोखंडी प्रवेशद्वार विघ्नेशच्या अंगावर कोसळले. त्यात तो गंभीर जखमी झाला.
    Maharashtra TimesRajya Sabha Election : राष्ट्रहितासाठी ठाकरेंनी राज्यसभेचा हट्ट सोडावा, काँग्रेसने गणित मांडलं; समीकरण तेच, तरी मविआत पेच

    उपचारापूर्वीच गतप्राण

    मुलाच्या अंगावर लोखंडी प्रवेशद्वार पडल्याचे पाहून वडील वल्लभ यांनी दुचाकी तेथेच टाकून मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली. मुळे दाम्पत्याने शेजारील लोकांच्या मदतीने विघ्नेशला तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच विघ्नेशचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विघ्नेशचा मृत्यू झाल्याचे सांगताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी हंबरडा फोडला. त्यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले.

    Nitin Gadkari | मुंबई, बंगळुरु प्रवाशांसाठी खूशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

    या दुर्दैवी घटनेची माहिती कळताच भोई समाजातील लोक, नातेवाईक आणि मित्र परिवाराने रूग्णालयात धाव घेतली. त्यांनी मुळे दाम्पत्याला सावरले. त्यानंतर मृतदेहाचे करण्यात आले. मंगळवारी सकाळी विघ्नेशवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वल्लभ मुळे यांच्या चौकोनी कुटुंबात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा होता. त्यालाच काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
    Maharashtra TimesAvinash Mohite : पवारांच्या चेल्यानं रणशिंग फुंकले, साखर कारखाना निवडणुकीसाठी दंड थोपटले, कृष्णाकाठी उडणार धुरळा

    कोल्हापुरात चिमुरडीचा मृत्यू

    दुसरीकडे, अवघ्या 2 वर्षांची चिमुकली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे 24 फेब्रुवारी रोजी हा दुर्दैवी अपघात झाला होता, दोन वर्षांची मंचरी ज्ञानेश्वर खोत ही बालिका उकळत्या दुधाच्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झाली होती. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा