• Thu. Sep 10th, 2026

९० वर्षापूर्वी विडा गावात मेहुण्याला चेष्टामस्करीत गाढवावर बसवलं, धुलीवंदनाची परंपरा आजही कायम

९० वर्षापूर्वी विडा गावात मेहुण्याला चेष्टामस्करीत गाढवावर बसवलं, धुलीवंदनाची परंपरा आजही कायम

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. अनंतराव देशमुख यांनी 90 वर्षांपुर्वी जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली होती.तेव्हा ९० वर्षांपासून सुरु झालेली ही परंपरा आज कायम आहे.दरवर्षी आठ दिवस अगोदरच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढून कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला जाणार आहे.यावर्षीचा हा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed