Pune Holi Event Accident: पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी लाइटचा गर्डर कोसळून काही तरुण-तरुणी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यांपैकी चौघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातात चार तरुण जखमी झाले असून त्यापैकी पार्थ श्रीराम पवार यांना गंभीर दुखापत झाल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान आयोजक शुभम मुकेश घोष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Lunar Eclipse : अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विचारांना तिलांजली, पुण्यात गर्भवती महिलेने ग्रहण काळात चिरली भाजी
मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर ‘रॉयल फार्म’ मध्ये स्टेजवर लोखंडी बीम उभारून ‘कलर कल्चर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत होता. कार्यक्रमात रंग खेळण्यासाठी पुण्यातील युवक व युवती यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Baramati Crime: बारामतीत प्रेमीयुगुलाला कोयत्याने मारहाण; सोन्या-चांदीचे दागिनेही लुटले, तीन विकृत तरुणांना अखेर अटक!
दुपारी दीडच्या सुमारास रंग खेळत असताना स्टेजचे लोखंडी बीम अचानक कोसळले. ते थेट युवकांच्या अंगावर पडले. स्टेज पडल्याने एकच धावपळ सुरू झाली. या दुर्घटनेत अनेक युवक जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही युवक घटनास्थळावरून स्वतःहून निघून गेले. मुंढवा पोलिसांकडून होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एका खासगी इव्हेंट कंपनीला परवानगी मिळाली होती. मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी सांगितले, ‘कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवर ‘रॉयल फार्म’ मध्ये ‘कलर कल्चर’ या कार्यक्रमात दुपारी दीडच्या सुमारास स्टेजवरील लोखंडी बीम अचानक कोसळल्यामुळे काही युवक जखमी झाले आहेत.’
