Maharashtra Politics : भाजपमधून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) उन्मेष पाटील यांनी प्रवेश केला होता
येत्या शुक्रवारी, दि.६ मार्च रोजी मुंबई येथे आपल्या कार्यकर्त्यांसह ते अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करतील. उन्मेष पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एकनाथ शिंदेंचं कौतुक
भाजपमधून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये (उबाठा) उन्मेष पाटील यांनी प्रवेश केला होता. त्यांनी सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊन या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काम करण्याची पद्धत चांगली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोण आहेत उन्मेष पाटील?
उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी 2019 मध्ये खासदारकी मिळवली होती. ती लोकसभा निवडणूक त्यांनी 4 लाख 11 हजार 617 इतक्या विक्रमी मताधिक्याने जिंकली होती, ती महाराष्ट्रात तिसरी सर्वोच्च ठरली होती.
त्याआधी 2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर 2015 ते 2019 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने महासंघ लिमिटेडचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
Kailash Kher : माणसं की जनावरं? नांदेडमधल्या रस्त्यांचे कैलाश खेरनी वाभाडे काढले, अशोक चव्हाणांसमोरच अॅक्टिंग करुन दाखवली
2024 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. आता जेमतेम दोनच वर्षांत त्यांनी ठाकरेंचं शिवबंधन सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
VSR चे मालक रोहित सिंह यांना अटक करा, व्हिडिओ शेअर करत अजित दादांचे पुत्र जय पवारांची मागणी
वारजूकर बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश
याआधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूकर यांनी आपल्या मुलांसह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता.
