Nashik Private Bus: नाशिकमध्ये खासगी बस आणि अवजड वाहनांवर लागू केलेली प्रवेशबंदी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. 31 मेपर्यंत या अधिसूचना लागू ठेवण्यात येणार आहेत.
द्वारका सिग्नल ते सारडा सर्कल आणि काठे गल्लीपर्यंत ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम सुरू आहे. त्यासाठी वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणात बदल केले असून, कार व दुचाकी मुंबई नाकामार्गे आणि टाकळीमार्गे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला खासगी बसचे सर्व थांबे रद्द करण्यासह शहरात प्रवेशबंदीची अधिसूचना जारी झाली होती. त्यामध्ये वाढ करून ३१ मेपर्यंत अधिसूचना लागू ठेवण्यासंदर्भात आदेश जारी झाले आहेत. शहरातील २९ रस्त्यांची दुरुस्ती, खोदकामाने उद्भवणारी कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय झाला आहे.
Nashik News: सिंहस्थात भाविकांसाठी थेट स्नानघाटापर्यंत ‘रुट मॅप’, 15- 20 किमीचा पायी प्रवास वाचणार; थेट वाहनतळांपर्यंत ‘शटल बस’
.. असे आहेत आदेश
- शहरात २९ रस्त्यांची व पाच उड्डाणपुलांची विकासकामे, दुरुस्ती, रुंदीकरण सुरू
- खासगी ट्रॅव्हल्समुळे द्वारका, मुंबई नाका, रुची हॉटेल, महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाउस, तिगरानिया रोड, कन्नमवार पूल, रामकुंड परिसरात वाहतूक कोंडी
- जड, अवजड वाहने व खासगी बसना सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत शहरात प्रवेश बंद; सकाळी ८ पूर्वी बस व वाहने शहरातून मार्गस्थ होतील
- सर्व खासगी बसचे थांबे, पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स, पार्किंग स्थळे रद्द
- तपोवन सिटीलिंक बस टर्मिनलच्या जागेत सर्व खासगी बस प्रवासी उतरवतील आणि भरतील, तसेच तेथेच वाहने पार्किंग करतील
- २८ फेब्रुवारी ते ३१ मे २०२६ या कालावधीत अधिसूचना लागू; आवश्यकतेनुसार अधिसूचनेत बदल आणि मुदत वाढविण्यात येईल.
अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा Ulwe Coastal Road, प्रवासात वाचणार 25 मिनिटं; 6.7 किमी मार्ग कुठून-कसा?
“वाहतूक सुरक्षा व अधिसूचनेत वाढ केली आहे. त्याचे तंतोतंत पालन करणे संबंधित वाहनमालक व चालकांना बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाई होईल,” अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त किरिथिका सी.एम यांनी दिली आहे.
