• Fri. Mar 6th, 2026
    मध्यवर्ती पुण्यात घरांना वाढती मागणी, तीन कारणांमुळे नागरिकांचा कल, गुंतवणूकदारांनाही आकर्षण

    Pune Real Estate : पुणे शहराचा विस्तार सुरू असताना चालू आणि आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा मध्य पुण्याला होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : चांगल्या पायाभूत सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, मेट्रोमुळे हक्काची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अशा विविध कारणांमुळे मध्य पुण्यात घर घेण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

    कुशमन अँड वेकफिल्ड यांच्या चौथ्या तिमाहीतील ‘रेसिडेन्शिअल मार्केटबिट’ या अहवालात या बाबी समोर आल्या आहेत. गेल्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यातील प्रीमियम गृहनिर्माण बाजाराची कामगिरी स्थिर राहिली आहे. एकूण घरविक्रीमध्ये काही प्रमाणात मंदी दिसून आली असली, तरी उच्चभ्रू आणि लक्झरी घरांची मागणी मजबूत राहिली.

    कोणत्या कारणांमुळे किमतीत वाढ?

    स्थिर मागणी, वाढती आर्थिक क्षमता, एनआरआय गुंतवणूकदारांचा कायम कल; तसेच मेट्रो विस्तार आणि महामार्ग कनेक्टिव्हिटीतील सुधारणा यामुळे घरांच्या किमतींमध्ये वर्षभरात सुमारे पाच टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. शहराचा विस्तार सुरू असताना चालू आणि आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा मध्य पुण्याला होत आहे.

    मध्यवर्ती पुण्यात कोणकोणता भाग?

    संगमवाडी, बंडगार्डन रस्ता, केनेडी रोड आणि मंगळवार पेठ या भागांचा समावेश असलेला मध्यवर्ती भाग शहरातील सर्वाधिक मागणी असलेल्या निवासी भागांपैकी एक बनला आहे. विकसित पायाभूत सुविधा, पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडलेला हा परिसर ऐतिहासिक वास्तू, जुनी मंदिरे आणि पारंपरिक बाजारपेठांसाठी ओळखला जातो. त्याचवेळी देश-विदेशातून आलेल्या रहिवाशांमुळे परिसराला कॉस्मोपॉलिटन स्वरूप प्राप्त झाले आहे.
    Maharashtra TimesNashik News : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कृत, पाच वर्षांनी विवाहिता सन्मानाने माहेरी, जातपंचायत बरखास्त

    प्रमुख भागात पोहोचणं सुलभ

    याशिवाय कोरेगाव पार्क, कल्याणीनगर आणि शिवाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांशी कनेक्टिव्हिटीमुळे रोजगार केंद्रे, शॉपिंग डेस्टिनेशन्स आणि सामाजिक सुविधा सहज उपलब्ध असल्यामुळे व्यावसायिक आणि कुटुंबीयांसाठी हा परिसर पसंतीचा ठरत आहे. रेल्वेस्थानक आणि लोहगाव विमानतळाशी चांगल्या कनेक्टिव्हिटीसह मेट्रो धावत असल्याने शहरातील प्रमुख भागांत सहज पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
    Maharashtra TimesVSR चे मालक रोहित सिंह यांना अटक करा, व्हिडिओ शेअर करत अजित दादांचे पुत्र जय पवारांची मागणी
    नियोजनबद्ध रस्ते, हिरवळ, नामांकित शाळा, रुग्णालये आणि मनोरंजन केंद्रांसाठी संगमवाडी परिसर ओळखला जातो. यामुळे येथे आधुनिक सुविधा, स्मार्ट होम तंत्रज्ञान आणि शाश्वत जीवनशैलीवर आधारित प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्प विकसित होत आहेत. मध्यवर्ती पुण्यात राहण्याचा फायदा म्हणजे मगरपट्टा सिटी, येरवडा; तसेच खराडीतील आयटी पार्क आणि कॉर्पोरेट हबपर्यंत सहज पोहोचता येते. धोरणात्मक स्थान, मजबूत भाडे मागणी आणि मालमत्तांची सातत्याने वाढणारी किंमत यामुळे मध्य पुणे गुंतवणूकदारांसाठीही आकर्षण ठरत आहे.

    Nitin Gadkari | मुंबई, बंगळुरु प्रवाशांसाठी खूशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा