Mangaon-Indapur Bypass: मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं आहे. उर्वरित मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितल.
जुलै २०२७मध्ये काम पूर्ण होणार?
आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्णावस्थतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘जगात सर्वांत दीर्घकाळ या महामार्गाचे बांधकाम सुरू असून त्यामागून अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे प्रकल्प पूर्ण झाले. परंतु हा मार्ग पूर्ण होताना दिसत नाही’, अशी टीका आमदारांनी सरकारवर केली. यावर भोसले यांनी उत्तर दिले. ‘माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू असून ते प्रगतीपथावर आहे.
Ghansoli to Airoli Flyover: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी खाडीवर पूल, घणसोली ते ऐरोली उन्नत मार्गाला गती; कसा असेल मार्ग?
माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठे पूल या कामांचा या प्रकल्पात समावेश आहे. ही कामे जुलै २०२५ मध्ये सुरू करण्यात आली असून जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने त्याच्याकडून ते काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आले आहे’, असेही भोसले यांनी सांगितले.
‘कोकणातील गणेशोत्सव काळातील वाहतूककोंडी लक्षात घेता माणगाव-महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्यवळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मेपर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल’, असेही ते म्हणाले.
Dahisar-Mira-Bhayander Metro: मेट्रो लाइन 9ची चाचणी फेरी यशस्वी, किरकोळ बदलांनंतर पहिला टप्पा होणार सुरू; दहिसर ते काशीगाव थेट जोडणी
बंदी नंतरही वाहतूक सुरुच
दरम्यान, रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अवजड वाहतूक सुरू असल्याने अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूककोंडीचे दुष्टचक्र सुरूच आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या आणि सणांमुळे गावी जाणारे नोकरदार आणि पर्यटकांसह स्थानिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा वाहतूक यंत्रणादेखील या कोंडीपुढे हतबल झाले असल्याचे चित्र अलिबाग-रोहा मार्गावर दिसून येते. अलिबाग-रोहा मार्गावर कुरूळ ते सुडकोली, कुरूळ-आक्षी मार्गे रेवदंडा तसेच, रेवदंडा बायपास रोड या ठिकाणी रस्ते, क्रॉस ड्रेन आणि गटारांची कामे सुरू आहेत. शनिवारी सहाण ते बेलकडे दरम्यान ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांसाठी बंदी आदेश काढला. मात्र वाहनांनी आदेश झुगारून वाहतूक सुरूच ठेवली.
