• Fri. Mar 6th, 2026
    Buldhana Crime: फेसबुक पोस्टची भुरळ, नोटा दुप्पट करण्यासाठी मध्यप्रदेशातील तरुण शेगावला, पण घडलं भलतंच

    Buldhana Crime: नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवून युवकाला अपहरण करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे.

    नोटा दुप्पटीच्या आमिषाने अपहरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: फेसबुकवरील पोस्टला भाळल्यानंतर मध्य प्रदेशातील युवकाला काही तरुणांनी नोटा दुप्पट करण्याचे आमिष दाखवित शेगाव येथे बोलविले. त्यांनतर संबंधीत युवकाला मारहाण करीत लूटण्यात आले. आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने ११२ नंबर डायल करीत मदत मागितल्याने पोलिसांनी त्याची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. इंद्रकुमार मुन्नीलाल यादव (वय २२, रा. देऊर, जि. रिवा) असे अपहृत तरुणाचे नाव आहे.

    काय घडलं?

    आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून इंद्रकुमारला विश्वासात घेतले. ‘तुम्ही एक लाख रुपये द्या. त्याबदल्यात आम्ही तुम्हाला ५ लाख रुपये देऊ’, असे आमिष आरोपींनी इंद्रकुमारला दाखविले. या लालसेमुळे इंद्रकुमार आरोपींच्या जाळ्यात अडकला. त्याला मध्य प्रदेशातून शेगाव येथे बोलाविण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी तो शेगावला पोहोचला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आरोपी विकास पाटीलसह त्याच्या तीन साथीदारांनी इंद्रकुमारला चिंचोली शिवारात नेऊन पैशांसाठी मारहाण केली. तसेच त्याच्या मोबाइलवरून स्वतःच्या क्यूआर कोडवर ४ हजार रुपये घेतले. नंतर त्याला शहरातील एका गोडाऊनमध्ये रात्रभर डांबून ठेवण्यात आले.

    Maharashtra TimesBuldhana Crime : जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
    दुसऱ्या एका घटनेत, जेवणासाठी मला का विचारले नाही, म्हणत पत्नीवर पतीने सुरीने वार केल्याची घटना खामगाव तालुक्यातील दधम येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. वंदना सुभाष शेजोळ (वय ४५) असे जखमी महिलेचे, तर, सुभाष भिकाजी शेजोळ, असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील दधम येथील वंदना शेजोळ ही घरी असताना पती सुभाष भिकाजी शेजोळ हा दारूच्या नशेत घरी आला.

    Maharashtra TimesNagpur HSC Paper Leak: शिक्षकानेच फोडले पेपर! मुख्य सूत्रधाराच्या मदतीने कृत्य, नागपूर बारावी पेपरफुटीप्रकरणी नवा खुलासा
    ‘तू रात्री जेवण केले, मला जेवणासाठी का विचारले नाही?’ असे म्हणत त्यानेवंदना यांच्याशी वाद घातला. आई-वडिलांत वाद झाल्याने मुलगा रोहन हा वडिलांना समजावण्यासाठी पुढे आला असता सुभाष याने त्यालाही शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. संतापाच्या भरात घरातील भाजी कापण्याची सुरी उचलून त्याने पत्नीवर वार केला. यात पत्नी जखमी झाली. हिवरखेड पोलिसांनी आरोपी पती सुभाष शेजोळ याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा