मुंबई-पुण्याच हवेची गुणवत्ता सुधारली?
गेल्या काही आठवड्यांमध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता ढासळल्याचे चित्र होते. शहरभर सुरू असलेल्या बांधकामांमधून उडणारी धूळ आणि सिमेंटवरून विविध स्तरांतून प्रशासनाला जाबही विचारण्यात आला. प्रशासनानेही प्रदूषण करणाऱ्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उचलला. त्यापाठोपाठ मुंबई, पुण्यातील हवा एकाएकी स्वच्छ झाल्यामुळे हा परिणाम बांधकामांवरील निर्बंधांमुळेच झाला असावा, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली.Panvel-Karjat Railway: पावसाळ्यानंतर पनवेल-कर्जत रेल्वेसेवा सुरू, मध्य रेल्वेवर पाचवा मार्ग; 5 स्थानकांचा समावेश
सोशल मीडियावर अनेकांनी निळ्या आकाशाचे फोटो शेअर केले, तर काहींनी कित्येक किलोमीटर दूर असलेल्या इमारतींचे, डोंगरांचे दर्शन घडत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
खरं कारण नैसर्गिक
एकाएकी सुधारलेली हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यामागे प्रशासकीय निर्णय नसून, सध्याची वैशिष्ट्यपूर्ण हवामानाची स्थिती असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला त्याबाबत माहिती दिली.
Bellasis Bridge: बेलासिस पूल प्रवाशांसाठी खुला, मुख्यमंत्र्यांकडून नामांतर; ताडदेव, मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या पुलाचं नवं नाव काय?
डॉ. खोले म्हणाल्या, ‘सध्या हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याची संक्रमणावस्था सुरू आहे. अशा स्थितीत भूप्रदेश वेगाने तापतो, तर समुद्राचे तापमान तुलनेने कमी वेगाने वाढते. त्यामुळे समुद्रावर जास्त दाब आणि जमिनीवर कमी दाब अशी स्थिती असते. सध्या अरबी समुद्रावर आणि बंगालच्या उपसागरावर अँटीसायक्लोनिक स्थिती (जास्त दाब) सक्रिय असून, त्याभोवती वारे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरत आहेत. या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे प्रदूषणात घट झाली असावी.’
‘कोरडी हवा आणि समुद्रावरील जास्त दाब यांच्या संयोगामुळे सध्या महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेशापासून ते कर्नाटक, आंध्र प्रदेशापर्यंत निरभ्र हवामान आहे. हवेतील धूलिकणांचे प्रमाण मोठ्या पावसामुळे किंवा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळेच कमी होऊ शकते. त्यामुळे सध्या स्वच्छ झालेली हवा हा संक्रमणावस्थेतील हवामानाचा परिणाम म्हणता येईल’, डॉ. मेधा खोले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग
