• Fri. Jul 31st, 2026

    ST Bus Accident: पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर

    ST Bus Accident: पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर

    Solapur Bus Accident News: जखमी प्रवाशांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    पुण्याकडून निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू, 10 जखमी, बसचा चक्काचूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: सोलापूर शहरात ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालक आणि एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास 10 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे 5 च्या सुमारास झाला. एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय 43, रा. चिवरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि नागुबाई राम रेवगे (वय 48 रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर प्रवाशांच्या बॅगा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

    मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एसटी बस पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याकडे ही बस जात होती. पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅण्डवर पोहोचली. त्यानंतर सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळगीजवळ हा भीषण अपघात झाला.

    ट्रकला एसटी बसची मागून धडक

    कुरकुंभहून निघालेल्या एसटी बसने साळईने भरून निघालेल्या ट्रकला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. सोलापूर बस स्थानकातून उमरगा (एम एच 14 एल बी 0380)(जिल्हा धाराशिव) कडे निघाली असता पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद सोलापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

    जखमींची नावे पुढीलप्रमाणे:

    1. रामचंद्र प्रभाकर देवघे (वय वर्ष 57 राहणार अंदुर जिल्हा धाराशिव )
    2. विकास प्रकाश पाटील (वय वर्ष 32 राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा )
    3. माणिक नागप्‍पा वायचळ (वय वर्ष 54 राहणार तांदूळवाडी तालुका दक्षिण सोलापूर )
    4. रामलिंग ब्रह्मानंद कापसे (वय वर्षे चाळीस राहणार धाराशिव )
    5. अभिषेक दीपक चव्हाण (वय वर्ष 25 राहणार उमरगा धाराशिव )
    6. अनिकेत सुभाष राठोड (वय वर्ष 30 राहणार सातारा )
    7. अभिजीत अरुण चव्हाण (वय वर्ष 44 राहणार नळदुर्ग जिल्हा धाराशिव )
    8. नागोराव किस्तू तोडसांग (वय वर्ष 37 राहणार किणवर परभणी )
    9. अनुराधा अर्जुन चव्हाण (वय वर्ष 60 राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव )
    10. तुलसीदास मनोहर पाचंगे (वय वर्ष 49 राहणार गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव )

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा