Live Marathi News: अणुकार्यक्रमाला मुरड घालण्याच्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या इराण-अमेरिका यांच्यातील तणावाने अखेर शनिवारी टोक गाठले. अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ले चढवले. या हल्ल्यांत २०० जण ठार झाले. अमेरिकेने इराणवर हल्ले करण्याची गेल्या आठ महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. इराणनेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याने युद्धाचा भडका उडाला आहे. दरम्यान, चेंबूर सुभाषनगरमधील बांधकामाधीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून सहा कामगार पडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींपैकी एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर
