Mumbai News: मेट्रो-चार दुर्घटनेला पंधरवडा पूर्ण होण्याआधीच आणखी एक घटना घडल्याने एमएमआरडीए कंत्राटदारावर वचक ठेवणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवडी वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम केईएम रुग्णालय परिसरात सुरू आहे. पुलावरील खांबात लोखंडी सळ्या बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी एक सळई रस्त्यावर पडली. सळई बॅरिकेडवर आदळून रस्त्यावरून चालणाऱ्या गणेश यांच्या डोक्याला लागली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गणेश यांना तातडीने परळ येथील ‘ग्लेन ईगल्स’ रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असून, वैद्यकीय उपचार सुरू आहे. गणेश बुधाले हे विक्रोळी येथील रहिवासी आहेत.
Mumbai Crime: डिजिटल अटकेत विकला फ्लॅट; मुंबईत 78 वर्षीय वृद्धाची फसवणूक, तब्बल सव्वा कोटींचा गंडा
दुर्घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गणेश यांची भेट घेऊन डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. दरम्यान खासगी रुग्णालयातील जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च ‘एमएमआरडीए’कडून करण्यात येईल, असे ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत जखमींना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. पुढील उपचाराचा खर्च देखील ‘एमएमआरडीए’कडून उचलण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे काय? AAIB कडून 22 पानांचा प्राथमिक रिपोर्ट जारी
कंत्राटदारांना नोटीस
परळ दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मेसर्स एसटीयूपी आणि प्रकल्प कंत्राटदार मेसर्स जे कुमार प्रोजेक्ट या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसच्या लेखी उत्तरानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्चित करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्याबाबत तातडीने आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा निरीक्षणात वाढ करण्याचे आणि ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.
