सध्या मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी खासदार अरविंद सावंत यांनी हजेरी लावली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार-खासदारांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतील प्रमुख प्रश्नांसंदर्भात ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांसह झालेल्या चर्चेबद्दल अरविंद सावंतांनी माहिती दिली.