Pune Crime News : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेल्या मजुराचा पार्थिव कल्याण दरवाजाच्या दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दशरथ धोत्रे हे चार दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसरात पुरातत्व विभागाच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडे ते इतर चार-पाच मजुरांसमवेत काम करत होते. सर्वजण किल्ल्यावरच वास्तव्यास होते. बुधवारी मध्यरात्रीपासून धोत्रे हे बेपत्ता होते.
Badlapur Crime: स्कूल बसमधील अटेंडंट गैरहजर, बसचालकातील राक्षस जागा झाला; बदलापुरात शाळकरी मुलीचा विनयभंग
पर्यटकांना दरीत दिसलं पार्थिव
धोत्रे यांच्यासहकाऱ्यांना ते गावाकडे निघून गेले असावेत, अशी शंका होती. दिवसभर त्यांच्याशी काहीच संपर्कही होऊ शकला नव्हता. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरीलकल्याण दरवाजा परिसरात पर्यटकांना दरीत पार्थिव दिसून आला. त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीतून पार्थिव बाहेर काढला. त्यानंतर पार्थिव स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. राजगड पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Crime News : बायकोच्या WhatsApp स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत
भिगवण प्रकरणात चर्चेत असलेल्या अझर शेखचा ‘गेम ओव्हर’
पुणे ग्रामीण पोलिसांच्य़ा स्थानिक गुन्हे शाखेने आज (27 फेब्रुवारी) रोजी अझर शेखला अटक केली आहे. दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्ह्या दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. तो अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच आहे. याशिवाय गेला आठवडाभर भिगवण प्रकरण जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं, त्यामधील आरोपी तरुण जहीर आणि आयान शेख यांचा तो नात्याने चुलता आहे. दरम्यान, अझर शेख हा दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता. यालाच अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेखच्या अटकेची मागणी केली जात होती.
