Pune Newlywed Ends Life: बाणेर परिसरात लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काय कारण?
काय घडलं असं?
या प्रकरणी पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१), सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), सासरे शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२) आणि नणंद रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. बाणेर) यांच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा आणि तेजस यांचा विवाह १३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला होता.
इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
विवाहानंतर सासरकडून मानपानावरून; तसेच हुंड्याच्या मागणीवरून छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सततच्या मानसिक छळाला कंटाळून गंगाने १९ फेब्रुवारीला राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune Crime : ‘पैसे दिले नाही, तर जिवंत सोडणार नाही’; पुण्यात एकट्यात गाठलं, मारहाणीत 24 वर्षीय तरुणाला संपवलं
तर दुसऱ्या एका घटनेत, सरकारी नोकरीचे स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या नैराश्यातून आणि बेरोजगरीमुळे अंबरनाथमध्ये एका तरुणीने आत्महत्या केली. प्रतीक्षा चंद्रशेखर राणे (२६) असे तिचे नाव आहे. पोलिस भरतीत सतत अपयश आल्याने ती मानसिक तणावाखाली होती. गुरुवारी तिने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Pune Crime : मावळच्या पोल्ट्री फार्मवर नोकरी, घरी सांगितलं चेन्नईतील आयटी कंपनीत जॉब; पुण्यात 25 वर्षीय तरुणाची बॉडी सापडली
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत प्रतीक्षाने आईवडिलांची माफी मागत मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. ‘सरकारी नोकरी मिळवू शकले नाही. पुढे काय करायचे हे समजत नाही. २६ वर्षांची होऊनही कुटुंबासाठी काही करू शकले नाही, ही खंत आहे,’ असे तिने नमूद केले. एकुलत्या एक मुलीच्या निधनाने राणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
