• Wed. Jun 17th, 2026
    बोल ना बाळा… आंचलचे सक्षमच्या भावाला मेसेज? गैरवर्तनाचे आरोप ताटे कुटुंबाने फेटाळले, स्क्रीनशॉटच दाखवले

    Nanded Crime : सक्षमचा लहान भाऊ शिवम आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल मामीडवारने केला होता, त्यानंतर सक्षमच्या आईने उत्तर दिलं आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेडमधील आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आंचलने प्रियकर सक्षम ताटे याच्या धाकट्या भावावर चुकीच्या हेतूने स्पर्श करत असल्याचे धक्कादायक आरोप केले होते. मात्र उलट आंचलच त्याला ‘बाळा, तू माझ्याशी बोलत का नाहीस?’ असं विचारत असल्याचा दावा सक्षमच्या आईने केला आहे.

    आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे याची गेल्या वर्षी आंचल मामीडवार हिचे वडील, भाऊ यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर प्रियकर सक्षम ताटे याच्या शवासोबत आंचलने केलेले विवाहविधी देशभरात गाजले होते.
    Maharashtra TimesSanchita Ugale : संचूss उठ ना बबड्या, मला आई म्हण ना… अभिनेत्री संचिता उगलेला अखेरचा निरोप देताना आईची व्याकुळ अवस्था

    आंचल घर सोडून गेल्याने चर्चा

    आंचलचे प्रेमसंबंधी तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. आंचलने स्वतःच्याच कुटुंबाविरोधात साक्ष दिली होती. त्यानुसार नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आंचलने सक्षमच्या घरी कायमचे राहणार असल्याचे म्हटले होते. पण काही दिवसांपूर्वी सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर येत आंचल घर सोडून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली.

    पवनराजेंसह समद काझींसाठी लढाई, २० वर्षांच्या संघर्षावर ओमराजेंचं मोठं विधान

    सक्षम ताटेच्या भावावर गंभीर आरोप

    आंचल अचानक घर सोडून का गेली? प्रेमाच्या आणाभाका विसरली का? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. त्यानंतर आंचल मामीडवार हिने माध्यमांसमोर येत घर सोडण्याविषयी धक्कादायक आरोप केला. सक्षमचा लहान भाऊ शिवम आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल मामीडवारने केला. त्यामुळेच आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही तिने केला. तर सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकटेच लढत असल्याचंही तिने म्हटलं.
    Maharashtra TimesMumbai News : तांदळातील कीटकनाशकाचा वास नाका-तोंडात, गिरगावात दोन वर्षांच्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज, 15 तासात 3 वेळा कार्डिअ‍ॅक अरेस्ट

    आंचलवर सक्षमच्या कुटुंबाचा पलटवार

    आजीकडे जाण्याचा बहाणा करुन आंचलने घर सोडल्याचा दावा सक्षमची आई संगीता ताटे यांनी केला आहे. आचलच्या आरोपाचे खंडन करत सक्षमची आई व आत्या यांनी पलटवार केला. आंचल ही सक्षमचा भाऊ शिवम याला ‘बाळा तू मला का बोलत नाही! तू इतका उदास का आहेस. तू माझ्या मेसेजला का उत्तर देत नाहीस. तू बोलत नसल्यामुळे माझे मन लागत नाही’ सारखे मेसेज करत असल्याचा दावा सक्षम-शिवमच्या आईने स्क्रीनशॉट दाखवून केला. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा