• Sat. Jun 6th, 2026
    Jalgaon Crime : क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद, मित्रानेच मित्राला मध्यरात्री संपवलं; लेकाचं शव बघून आई-वडिलांना अश्रू अनावर

    Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जळगावमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    भुसावळ सिमेंटच्या कुंडीने तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोन मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाला या वादाचं रूपांतर थेट हत्येत झालं. मित्रानेच मित्राच्या डोक्यात सिमेंटची कुंडी घालून मित्राला ठार केल्याची मोठी घटना भुसावळ शहरात घडली आहे. शहरातील आनंदनगर-नेब कॉलनी परिसरात आज शनिवारी मध्यरात्री झालेला शाब्दिक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय 42) रा. आनंदनगर नेब कॉलनी असं मृत व्यक्तीचं नाव असून किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. हत्या झालेल्या व्यक्ती आणि संशयित हे दोन्ही मित्र असल्याची माहिती देखील आहे.

    नेमकं काय घडलं?

    आज शनिवारी मध्यरात्री साधारण एक वाजेच्या सुमारास सावकारे यांचं त्याच परिसरातील एका तरुणाशी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर झाडे लावण्याची सिमेंटची कुंडी अनिल सावकारे यांच्या डोक्यावर मारण्यात आल्याने यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ ट्रान्सपोर्ट निरीक्षक राहुल वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून संबंधित पुरावे जप्त केले असून घटनेच्या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
    Maharashtra TimesPune Crime : मध्यरात्री अचानक गायब, मोबाइलही बंद, सगळीकडे शोधाशोध; पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता मजुराचं पार्थिव
    दरम्यान, या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे अशा गुन्हेगारीने डोके वर काढलं असल्याने सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाचा जळगाव जिल्ह्यावर वचक नसल्याचं यावरून दिसून येत आहे.
    Maharashtra TimesPune Crime: सुखी संसाराचं स्वप्न भंगलं! लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्यांकडून छळ, पुण्यात नवविवाहितेनं संपवलं जीवन

    शिक्षकाला संस्थाचालक अन् नातेवाईकांकडून चोप

    राज्यभरात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना, छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या शिक्षकाने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी आणि शाळा संस्थाचालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा