• Sat. Mar 7th, 2026
    बायकोच्या WhatsApp स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत

    Nalasopara Man killed by Neighbour : संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला असताना हा प्रकार घडला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे पेटलेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंटचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

    पालघर जिल्ह्यात मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत नालासोपारा पश्चिमेतील हनुमान नगर परिसरात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आफताब शेख (२४) असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    नेमकं काय घडलं?

    आफताब शेख हा पत्नी शबाना (२२) हिच्यासोबत नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर भागात राहत होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे शबानाने आनंद व्यक्त करत व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते.

    हे स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (२२) याने अश्लाघ्य कमेंट केली. इतकंच नव्हे तर त्यानंतर इन्स्टाग्रामवरही त्याने शबानाला उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला.
    Maharashtra TimesKomali : तो माझा नाही हे समजतंय, पण… 21 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, डायरीतील पानांमुळे कारणांचा उलगडा

    वादावादीतून हल्ला

    हनुमान नगर येथे झालेल्या या भेटीत सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मात्र काही क्षणांतच वाद चिघळला आणि मेहंदीने चाकू काढून आफताबवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या आफताबचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवशीच पतीचा मृत्यू झाल्याने शबानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    Parth Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर घातपाताचा संशय, पण पार्थ पवार बोलत का नाही ?

    पूर्वीचे शेजारी

    घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपी आणि मयत हे पूर्वी एकमेकांच्या शेजारी राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
    Maharashtra TimesBolivia Plane Crash : बोलिव्हियात वायुसेनेचं विमान कोसळलं, 15 जणांचा मृत्यू, अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेल्या नोटा उचलण्यासाठी गर्दी
    धक्कादायक म्हणजे नालासोपारा-वसई परिसरात गेल्या पंधरा दिवसांत घडलेली ही हत्येची पाचवी घटना आहे. विविध कारणांवरुन वाढणारे वाद थेट जीवघेण्या हिंसेपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा