• Sun. Mar 8th, 2026

    Nanded News: मित्रासोबत सेल्फी काढायला गेला, नदीत पडून 34 वर्षीय इंजिनियरने जीव गमावला; एक वर्षाच्या लेकीचं पितृछत्र हरपलं

    Nanded News: मित्रासोबत सेल्फी काढायला गेला, नदीत पडून 34 वर्षीय इंजिनियरने जीव गमावला; एक वर्षाच्या लेकीचं पितृछत्र हरपलं

    Man Falls While Clicking Selfie: नांदेडमध्ये एका 34 वर्षीय तरूणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्रासोबत नदी काठी सेल्फी काढताना तोल गेल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड: जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एका अभियंत्याचा नदीत पडून मृ्त्यू झाला आहे. सेल्फी काढताना हा 34 वर्षीय तरूण नदीत पडला असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जिल्ह्यात कंधार तालुक्यात घडली. अविनाश किशन हांडे अस मृतक तरुणाच नाव आहे. नांदेडमध्ये शासकीय काम आटोपून कंधार मार्गे उदगीरला जातं असताना बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावर ही घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे आठ महिन्या पूर्वी देगलूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली होती.

    दिवसभर काम संपवून घरी निघाले

    मयत अविनाश हांडे हे मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील रहिवासी आहेत. गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी अविनाश आणि त्याचा मित्र चंद्रकांत दबडे हे दोघेजण 26 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये आले होते. एका शासकीय कामानिमित्त ते दोघेही मोटारसायकलवरून नांदेडला आले होते. दिवसभर त्यांनी शासकीय काम आटोपले. काम आटोपून दोघेजन दुचाकीने कंधार मार्गे उदगीरला परत निघाले.

    Maharashtra TimesNanded Crime : नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, तरुणावर गंभीर आरोप, 5 जणांवर गुन्हा दाखल

    मोटारसायकलवरून परत जाताना कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीचा पुलावर आले असता दोघांनी फोटो काढण्याचा विचार केला. मोबाईलमध्ये फोटो देखील काढले, यावेळी अविनाश हांडे हा सेल्फी काढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि पाय घसरून तो नदीत पडले.

    Maharashtra TimesNanded News: तोंडाशी आलेला घास हिरावला, नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, बळीराजाची चिंता वाढली

    वेळेत मदत न मिळाल्याने जीव गमावला

    अविनाश नदीत पडताच सोबतचे साथीदार चंद्रकांत दबडे यांनी आरडाओरड करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केले परंतु मदतीला कुणी धावून आले नाही . अविनाशला पोहता येत नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमाववा लागला. दरम्यान, घटनेनंतर गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढले. या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मृत अभियंता यांच्या त्यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाची मुलगी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने मुलीच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवले आहे. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा