• Sat. Mar 7th, 2026

    Khandesh Expressway: उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा ‘खान्देश एक्स्प्रेस’ महामार्ग! सहापदरी, 105 किमी लांब मार्गाने थेट समृद्धीला जोडणार

    Khandesh Expressway: उत्तर महाराष्ट्र- मराठवाडा ‘खान्देश एक्स्प्रेस’ महामार्ग! सहापदरी, 105 किमी लांब मार्गाने थेट समृद्धीला जोडणार

    Jalgaon-Chhatrapati Sambhajinagar Highway: जळगाव ते संभाजीनगर महमार्ग आता सहा पदरी होणार असून तो खान्देश एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जाणार आहे. हा मार्ग लवकरच थेट समृद्धी महमार्गाशी जोडला जाणार आहे.

    जळगाव: जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा व उत्तर महाराष्ट्र – मराठवाड्याला जोडणारा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग आता सहापदरी ‘खान्देश एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग थेट ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’ला जोडला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली.

    विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात या महामार्गाबाबत आश्वासन दिले होते, याची आठवण करून देत खडसे म्हणाले, ‘घोषणा होऊन बराच काळ लोटला, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? हा मार्ग केवळ कागदावरच राहणार का?’ असा थेट सवाल उपस्थित केला.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात बुलेट ट्रेनची 4 स्थानकं, पहिल्या टप्प्यात ठाणे, विरारचा विकास; कधी-कसं होणार काम?

    केळी उत्पादकांना होणार फायदा

    या महामार्गामुळे जळगावच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर जळगावची केळी थेट समृद्धी महामार्गावरून मुंबई आणि नागपूरच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अत्यंत कमी वेळेत पोहोचू शकेल. या महामार्गामुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

    विकासाची नवी आशा

    या महामार्गामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर केवळ वेळेच्या दृष्टीनेच कमी होणार नाही, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील दळणवळणाचे एक नवे पर्व सुरू होईल. खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने दिलेल्या या उत्तराने जळगाव जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असून, आता सर्वांचे लक्ष या मार्गाच्या भूमीपूजनाकडे लागले आहे.

    Maharashtra TimesNashik-Akkalkot Highway: नाशिक-अक्कलकोट महामार्गाला गती! 30 गावांमधून जाणार रस्ता; कसा असेल 374 किमी लांब मार्ग?

    काय आहे ‘खान्देश एक्स्प्रेस’ प्रकल्प?

    सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. हा मार्ग थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. ज्यामुळे मुंबई आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक वेगवान होईल. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर तांत्रिक मान्यतेसह प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगहतले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा