• Sat. Mar 7th, 2026
    Mumbai Local Update: मार्चच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा; तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द?

    Mumbai Local Megablock: ब्लॉक वेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

    मुंबई लोकल ब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    मध्य रेल्वे
    स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार
    मार्ग – अप आणि डाउन धीमा
    वेळ – स. १०.५५ ते दु. ३.५५
    परिणाम : ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

    Maharashtra TimesShikhar Bank Scam : शिखर बँक घोटाळा प्रकरण बंद, अजितदादांना क्लीन चिट, सुनेत्रा पवारांच्या अडचणी दूर, रोहित पवारांनाही दिलासा
    हार्बर रेल्वे
    स्थानक – कुर्ला ते वाशी
    मार्ग – अप आणि डाउन
    वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
    परिणाम : सीएसएमटी ते वाशी- बेलापूर-पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावतील.

    Maharashtra TimesHoli 2026: शिमगो इलो, होय महाराजा…! मुंबईहून 2 दिवस सर्वाधिक एसटी बसेस कोकणासाठी रवाना होणार, कसं आहे नियोजन?
    पश्चिम रेल्वे

    स्थानक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
    मार्ग – अप आणि डाउन धीमा
    वेळ – स. १०.३५ ते दु. ३.३५
    परिणाम : ब्लॉक वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    मुंबई-रत्नागिरी अनारक्षित फेऱ्या
    मुंबई :
    होळीनिमित्त प्रवासी गर्दी वाढल्याने मध्य दिवा-चिपळूण-दिवा, रेल्वेने पनवेल-रत्नागिरी-पनवेल दरम्यान सहा अनारक्षित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २७ फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत आठ डब्यांच्या मेमू धावणार आहेत. (०११५७) पनवेलहून विशेष मेमू दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रत्नागिरीला रात्री ११.५५ ला पोहोचेल. (०११५८) रत्नागिरी येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला दुपारी ४.१० ला पोहोचेल. २८ फेब्रुवारी, एक मार्चला मेमू धावणार आहे. (०११५९/६०) दिवा-चिपळूण-दिवा मेमू एक मार्च ऐवजी दोन मार्चला धावेल.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा