• Mon. Jun 15th, 2026
    Abhishek Kalamkar : नोकरीला लावून देण्याचं आमिष, लॉजवर वारंवार अत्याचार; अभिषेक कळमकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल

    Ahilyanagar Abhishek Kalamkar Case : फिर्यादी तरुणीने आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत नाव गोपनीय ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

    अभिषेक कळमकर विनयंभग गुन्हा दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात तरुणींशी गैरवर्तन, अत्याचार आणि धमकावल्याच्या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एका 22 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, नोकरीचं आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन, शिवीगाळ आणि जीव घेण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

    व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंगचा आरोप

    दरम्यान, 22 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या गुन्ह्यातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शाळेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत ओळख वाढवली. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे प्रकरण अधिकच तापले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : आई-वडिलांचं सतत भांडण, एकुलत्या एक लेकीच्या मनावर खोलवर परिणाम; नैराश्यात चिमुकलीचं टोकाचं पाऊल

    तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी

    तरुणीने या प्रकाराला विरोध करत गाडीतून उतरल्यावर कळमकर यांनी शिवीगाळ करत ‘ही बाब कुठे सांगितली तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. राजकीय प्रभावामुळे भीती वाटत असल्याने आजपर्यंत तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र, अन्य महिलेसोबतही अशाच प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तिने धाडस करून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
    Maharashtra TimesSunetra Pawar Baramati By Election : अजित पवारांची बारामती सुनेत्रा पवारांच्याच हाती, पोटनिवडणुकीसाठी उमेदवार फिक्स; बैठकीत मोठा निर्णय

    आरोपी फरार; पोलिसांची दोन पथके रवाना

    सदर गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पुढील तपासासाठी तो तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कळमकर फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष दोन पथके स्थापन केली आहेत. ही पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा