• Fri. Aug 7th, 2026

    Maharashtra Weather 25 Feb: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’; 24 तास महत्त्वाचे

    Maharashtra Weather 25 Feb: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’; 24 तास महत्त्वाचे

    IMD Rain Alert 25 Feb: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावासने धुमाकूळ घातला असून हवामान विभागाच्या अंदाजात येत्या 24 तासांतही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

    मुंबई: महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी पाऊस पडला. रेणापूर तालुक्यात सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान गारपिटीमुळे काही ठिकाणी पत्र्याची घरे पडली आहेत; तसेच गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेलाच दिसत आहे. आज, 25 फेब्रुवारीला, दिवसभर राज्यातील हवामान कसं असेल ते जाणून घेऊया.

    विदर्भात मोठे नुकसान

    काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.Maharashtra TimesIMD Rain Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, अनेक जिल्ह्यांना झोडपलं; आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार? IMD चा ताजा अंदाज

    कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

    राज्यातील सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा आणि विदर्भला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विर्दभातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

    मुंबईत पारा चढणार

    दरम्यान, मुंबईमध्ये उकाडा कायम आहे. मंगळवारी संपूर्ण शहरात सरासरीपेक्षा 3.2 अंश अधिक तापमान नोंदवलं गेलं होतं. मुंबईमध्ये तापमानाचा पारा बुधवारी 25 फेब्रुवारी रोजीही चढाच असेल, असा अंदाज आहे. त्यानंतर दोन दिवस एखाद्या अंशांनी कमाल तापमानात दिलासा मिळेल, परंतु हा दिलासा फार काळ मिळणार नसून पुन्हा एकदा तापमान चढू लागेल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात दोन दिवसांनी तापमानाचा पारा चढू लागेल. आठवडाभर हे चढे तापमान कायम असेल, अशी शक्यता आहे.

    Maharashtra TimesSwargate ST Bus Stand: स्वारगेट अत्याचाराला एक वर्ष उलटलं, एसटी स्थानकात अजूनही ढिसाळ व्यवस्था; सुरक्षारक्षक, पोलिस कुठे?

    पावसामुळे मोठं नुकसान

    सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी ज्वारीचे धाट आडवे पडले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. रेणापूर तालुक्यात झालेल्या पिकाच्या आणि घराच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे करून शेतकर् यांना आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने विनविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी केली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा