Maharashtra Budget Session : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली खाती तूर्तास पक्षातील इतर मंत्र्यांना देण्यासंबंधीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले
काय आहे कारण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली खाती तूर्तास पक्षातील इतर मंत्र्यांना देण्यासंबंधीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग दादा भुसे यांच्याकडे, नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी उदय सामंत यांना, तर गृहनिर्माण खात्याची धुरा शंभुराज देसाई यांच्यासकडे सुपूर्द करण्यात आली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने यासंबंधी बातमी दिली आहे
Pune News : मळणीयंत्रात केस अडकले, पुण्यात महिलेचा हृदयद्रावक अंत, वाढदिवशीच मृत्यूने गाठलं
दोन्ही सभागृहात प्रश्न
अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यांसंबधी विरोधीपक्षांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आता जबाबदारी मिळालेले मंत्री देणार आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात एकाच वेळी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात प्रश्न येत असल्याने ही तात्पुरती तजवीज करण्यात आल्याची माहिती आहे.
अधिवेशनाला सुरुवात
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने आज, सोमवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा परिचय करून देण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून शोक प्रस्ताव सादर करण्यात आला. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यादांच विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे.
किशोरी पेडणेकरांची मातोश्रीकडून फसवणूक? विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवर संतोष धुरींचा खोचक टोला
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात अजित दादांच्या शोक प्रस्तावात दोन्ही सभागृहाचे सदस्य सहभागी होत आहेत. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात होईल. वंदे मातारम आणि राज्यगीताने विधानसभेच्या कामकाजास सुरुवात होईल. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधऱ्यांविरोधात आंदोलन केले जाण्याची दाट शक्यता आहे.
Alan Rumi : कार चालकाला शिक्षा करुन आमचं बाळ परत येणार नाही; 2 वर्षांच्या लेकाचा मृत्यू, आई-बाबांकडून ‘निष्पाप’ ड्रायव्हरच्या मुक्ततेची मागणी
