Chhatrapati sambhajinagar news: बदनामीची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी; २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: फोनवरील संभाषणाची माहिती सर्वांना सांगण्याची धमकी देत एका २६ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
गणपती ऊर्फ गणेश काकासाहेब मिसाळ रा. वाहेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या संशयित नराधम आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी गणेश मिसाळ याने पैठण तालुक्यातील २६ वर्षीय पीडित तरुणीला गाठून तिच्यासोबत झालेल्या फोनवरील संभाषणाची माहिती इतरांना सांगण्याची भीती घातली. ही माहिती नातेवाईक आणि समाजमाध्यमांमध्ये उघड करण्याची धमकी देत, आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर, हा संतापजनक प्रकार जर कोणाला सांगितला, तर थेट ‘जीवे मारून टाकीन’ अशी क्रूर धमकीही आरोपीने पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला दिली होती. आरोपीच्या सततच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने हिंमत दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि नराधम आरोपीविरोधात तक्रार दिली.
गुन्हा दाखल ; आरोपी गजाआड
तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत संशयित आरोपी गणेश मिसाळ याला वाहेगाव परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा