Badlapur Ovary Trafficking Racket : बदलापूर येथील जोवेली भागात परिमंडळ चारच्या पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत गर्भाशयातील बीजांडांची विक्री करणारी टोळी उघडकीस आणली
काय आहे प्रकरण?
बदलापूर येथील जोवेली भागात परिमंडळ चारच्या पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत गर्भाशयातील बीजांडांची विक्री करणारी टोळी उघडकीस आल्याने बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या टोळीने तीनशेहून अधिक गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांना इंजेक्शन देत गर्भाशयातील बीजांडांची वाढ केली होती आणि त्यानंतर या महिलांना रुग्णालयात नेऊन त्यांची बीजांडे काढून त्याची विक्री केली, असे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी बदलापूरसह विठ्ठलवाडी आणि वांगणी येथेही ही कारवाई केली.
आरोपी महिलांच्या फोनमध्ये काय?
आरोपी महिलांच्या मोबाइल फोनमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ७० ते ८० हजार रुपयांना या बीजांडांची विक्री करत होत्या. गर्भाशयात बीजांडांची वाढ करणाऱ्या गरजू महिलांना ३० हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळत असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
Jay Patil : मित्रांसोबत बीचवर जातोय, जयने सकाळी केलेला फोन, लाटेत वाहून गेल्याने बेपत्ता; बहीण-आईपासून पाटील कुटुंबाने सत्य लपवलं
ही टोळी इच्छुक ग्राहकांना लाखो रुपयांच्या बदल्यात या बीजांडांची विक्री करत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात लाखो-कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली, असाही पोलिसांचा अंदाज आहे.
Anjali Damania यांच्या निशाण्यावर शिंदे आणि नाईक, ठाणे आणि पनवेलमध्ये सर्वात जास्त डान्स बार
नॅनो सिटीतील एका इमारतीत सुलक्षणा गाडेकर नामक महिलेच्या घरात बीजांडविक्रीचे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, बदलापूर पूर्व पोलिसांच्या पथकाने बुधवारी बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकासह छापा मारला होता. त्यावेळी घरात गर्भाशयात स्त्रीबीजांची वाढ करण्यासाठी लागणारी इंजेक्शन आढळून आली होती. गाडेकर ही गरजू महिलांना हेरून पैशांचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले.
Solapur Crime : पार्लर बंद केल्याने स्वप्न भंगलं, सोलापुरात नवविवाहितेने आयुष्य संपवलं, हातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?
धागेदोरे बाहेरील राज्यात
विशेष म्हणजे, या टोळीचे धागेदोरे राज्यातील नाशिक, नागपूरव्यतिरिक्त तेलंगण तसेच बेंगळुरूपर्यंत पोहोल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी महिलांच्या मोबाइल फोनमधून मिळालेल्या संपर्क क्रमांकांतून आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
