विदर्भ, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या मराठवाड्यासह देशात सर्वाधिक आहेत. २००५ पासून ही परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. आतापर्यंत काही लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लोकसभेत मान्य केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांची तीव्रता लक्षात घेता कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी समाजवादी जनपरिषदेने केली आहे. शेतकरी आत्महत्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.
Electric Shock : मंदिरामुळे चप्पल काढली, अनधिकृत बॅनर हटवताना पालिका कर्मचाऱ्याचा शॉकने मृत्यू, दोन लेकींचं पितृछत्र हरपलं, जाधव कुटुंबाचा आधार गेला
सरकारने हा प्रश्न राजकीय हितसंबंध किंवा अन्य विषयाच्या अनुषंगाने प्रतिष्ठेचा न बनवता कर्जमुक्तीचा निर्णय त्वरित करावा. जेणेकरून दररोज होत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबतील. मागास भागातील शेती, सिंचन, गुंतवणूक, कर्जपुरवठा, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या योजना राबवण्याची भूमिका अग्रक्रमाने घेणे आवश्यक आहे.
मराठवाडा-विदर्भाच्या विकास योजना आणि त्यांचा आर्थिक-सामाजिक अनुशेष भरून काढणे आवश्यक आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. विष्णू ढोबळे, रंजन दाणी आणि अॅड. गौतम साळवे यांनी म्हटले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जालना ६, परभणी २, हिंगोली ५, नांदेड ११, बीड २४, लातूर ३, धाराशिव ५ अशा मराठवाड्यात एकूण ७६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
Crime News : सकाळी शेतात गेल्या, पुन्हा परतल्याच नाही, वृद्ध महिलेला निर्घृणपणे संपवलं; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?
महाग खते, बियाण्यांचे काय करायचे?
खते, बियाणे, औषधी यांचे वाढते दर आणि शेतीमालाचे कोसळलेले बाजारभाव शेतकरी आत्महत्यांचे कारण ठरत आहे. अपवादानेच शेतीमालाला हमीभाव मिळत आहे. शेती परवडत नसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. कर्जबाजारीपणा हेच बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण ठरले आहे. शेतकरी कर्जमुक्ती कधी करणार, असा सवाल राज्य सरकारला करण्यात आला आहे.
Police Bharti: संग्रामचं वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, १६०० मीटर धावताना अचानक कोसळला; भर मैदानात काय घडलं?
शेतकरी आत्महत्या या प्रश्नाच्या आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक बाजू लक्षात घेऊन कर्जमुक्तीसह कायमस्वरुपी उपाययोजना करणारी धोरणे मराठवाडा-विदर्भात राबविण्याची गरज आहे. शेती आणि समाजातील उत्पादक शक्तींची परवड, वास्तविक परिस्थिती सरकारने समजून घेणे अपेक्षित आहे. –अॅड. विष्णू ढोबळे, प्रदेशाध्यक्ष, समाजवादी जनपरिषद
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या
वर्ष -आत्महत्या
२०२२ —१,०२२
२०२३ —१,११६
२०२४ —९५२
२०२५ —१,१२९
