• Sun. Jun 7th, 2026

    लेकीच्या उपचारासाठी सासरच्यांकडून अपुरी मदत, पतीने महिलेला दिली ‘ती’ धमकी; घरासमोरच विवाहितेचं टोकाचं पाऊल

    लेकीच्या उपचारासाठी सासरच्यांकडून अपुरी मदत, पतीने महिलेला दिली ‘ती’ धमकी; घरासमोरच विवाहितेचं टोकाचं पाऊल

    Beed Woman Ends Life: बीडमध्ये एका महिलेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड: बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या चनई येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    बापु अर्जुन कांबळे (रा. डिसकळ, ता. कळंब, जि. धाराशीव) यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्न पाच वर्षांपूर्वी चनई येथील अजय तुकाराम चौरे याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर पती अजय याला दारूचे व्यसन जडले. तो भाग्यश्रीला सतत मारहाण करत असे, तर सासू अयोध्या आणि सासरे तुकाराम हे तिला घरकाम येत नाही आणि तू संसार करू शकत नाहीस असे म्हणून टोमणे मारून मानसिक छळ करत होते. दरम्यान, नात आम्रपाली आजारी असताना उपचारासाठी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. गरिबीमुळे बापु कांबळे यांनी दोन-तीन हजार रुपये पाठवले, मात्र पूर्ण पैसे का दिले नाहीत यावरून अजयने भाग्यश्रीला मारून टाकण्याची धमकी दिली होती.Maharashtra TimesCrime News : कॉलेज पार्टीत पेयातून गुंगीचं औषध, सख्ख्या भावांचा विद्यार्थिनीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, महाराष्ट्र हादरला

    सीताफळाच्या झाडालाच…

    या जाचाला कंटाळून भाग्यश्रीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोरील सीताफळीच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या माहेरच्यांनी अंबाजोगाईत धाव घेतली. मुलीच्या मृत्यूस पती अजय तुकाराम चौरे, सासू अयोध्या तुकाराम चौरे आणि सासरे तुकाराम चौरे हे जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesCrime News : सकाळी शेतात गेल्या, पुन्हा परतल्याच नाही, वृद्ध महिलेला निर्घृणपणे संपवलं; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?

    अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ३(५), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकुमार राजेंद्र पवार करत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा