उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे बीडच्या दौऱ्यावर आहेत. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत बारामतीतील विमान अपघातावर प्रश्न उपस्थित केले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाताची माहिती जनतेसमोर आली पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी अंधारेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित केले. अनिकेत तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य केल्याने अंधारेंनी टीका केली.