Mumbai Musical Road: मुंबईतील सागरी किनारा मार्गावर नुकताच मेलडी रोडचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. पण परिसरातील नागरिकांचा या उपक्रमाला नकारातम्क प्रतिसाग असून त्यांनी हे बंद करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांना सतत त्रास
कोस्टल रोडवर काही दिवसांपूर्वी संगीत पट्ट्या लावल्या होत्या. गाडी या पट्ट्यांवरून जाताच ‘जय हो’ हे गाणं वाजतं. असा उपक्रम दुबई व जपान सारख्या देशांमध्ये केला होता. तिथे ‘मेलडी रोड’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण भारतात चित्र उलट आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 पर्यंत वाजणाऱ्या या गाण्यामुळे कोस्टल रोडच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना दिवसभर त्यांच्या घरात दारं-खिडक्या बंद करून बसावं लागत आहे.
Dighi Port to Pune: रायगड-पुणे प्रवासात वेळ वाचणार? ताम्हिणी घाटासाठी दोन पर्यायी मार्ग प्रस्तावित; 30 ते 50 किमी अंतर होणार कमी
ब्रिच कँडी परिसरातील नागरिकांच्या रहिवासी संघटनेने याबद्दल तक्रार करत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राची एक कॉपी त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पाठवली आहे. या पत्रामध्ये हा ‘मेलडी रोड’ बंद करण्याची मागणी केली आहे. तब्बल 650 परिवारांकडून हे पत्र पाठवण्यात आलं आहे. परंतु, महापालिकेकडून अद्याप काही उत्तर आलं नाही आहे.
परिसरात शाळा व रुग्णालय
या मार्गाच्या परिसरात शाळा व रुग्णालय देखील आहेत. दिवसभर वाजणाऱ्या गाण्यांमुळे शाळेतील विद्यार्थी व रुग्णांनादेखील त्रास होत आहे. शिवाय या मार्गांवर वाहनं वेगाने जात असतात. सतत वाजणाऱ्या गाण्यामुळे वाहनचालकांचं लक्ष विचलित होऊन अपघातांचं प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे असंही त्यांनी त्या पत्रात नमूद केलं आहे.
Mumbai Coastal Road: देशातील पहिला ‘म्यूझिकल रोड’ मुंबईमध्ये, कोस्टल रोडवरील प्रवास मनोरंजक होणार; महापालिकेचा नवा प्रकल्प पाहा
भारतात पहिल्यांदाच मुंबईमध्ये ‘मेलडी’ किंवा ‘म्यूझिकल रोड’ सुरू करण्यात आला आहे. कोस्टल रोडवरील वेगमर्यादेत वाहन चालवल्यावरच या पट्ट्यांवरील गाणं वाजतं. त्यामुळे वाहनचालक त्या निमित्ताने वेगमर्यादेचं पालन करतील अशी यामागील संकल्पना होती. पण या मार्गाशेजारी दाट लोकवस्ती असून नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो याचा विचार न करताच मार्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक संतापले आहे.
