Pune Flyover Demolition : हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग तयार करताना गाडीतळ; तसेच नोबेल हॉस्पिटलजवळील महापालिकेने बांधलेल्या उड्डाणपुलांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे.
कोणत्या उड्डाणपुलांवर हातोडा?
हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग तयार करताना गाडीतळ; तसेच नोबेल हॉस्पिटलजवळील महापालिकेने बांधलेल्या उड्डाणपुलांवर हातोडा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उन्नत मार्गाचेच ‘रॅम्प’ या रस्त्यांवर उतरविल्यास या चौकांतील वाहतूक कोंडी फुटणार असल्याने येथील सध्याचे उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हडपसर ते यवत उन्नत मार्ग
हडपसर-लोणी काळभोर या मेट्रो मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याच वेळी पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या उन्नत मार्गाच्या वर मेट्रोचा मार्ग असणार आहे. त्यामुळे हा दुहेरी पूल तयार करण्याचे काम ‘महामेट्रो’कडेच सोपविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग भैरोबा नाल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपूल मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलासाठी पाडावा लागला होता. त्याचप्रमाणे या मार्गावर असलेले गाडीतळ; तसेच नोबेल हॉस्पिटलजवळील उड्डाणपूल पाडावे लागणार आहेत.
Pune News : शाळेत सोडण्याचा बहाणा, पुण्यात अल्पवयीन मुलीवर फॅमिली फ्रेण्डचा अत्याचार, डीपी रोडला कार थांबवली अन्…
अजित दादांसोबतच्या बैठकीत झालेली चर्चा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये गाडीतळ; तसेच नोबेल हॉस्पिटलजवळील सध्याच्या उड्डाणपुलांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हे उड्डाणपूल पाडण्याची आवश्यकता भासेल, असे त्या वेळी सांगण्यात आले होते; तसेच या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्याचा आदेश पवार यांनी दिला होता. हे उड्डाणपूल पाडावे लागले, तर ते पाडण्याचे खरे आव्हान यंत्रणांपुढे असणार आहे. सोलापूर रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेता सध्या असलेले उड्डाणपूल पाडणे आणि नव्याने उड्डाणपूल बांधण्याचे शिवधनुष्य यंत्रणांना पेलावे लागणार आहे.
Crime News : आई, तू दुसरा नवरा केलास, मी पुन्हा लग्न केलं तर काय? सख्ख्या माऊलीने जीव घेतला, महाराष्ट्र हादरवणाऱ्या खून प्रकरणाचा छडा
पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या रिंग रोडच्या पूर्व भागाचे काम २०२८, तर पश्चिम भागाचे काम २०२६पर्यंत पूर्ण करण्यात येईल. रिंग रोड पूर्वमधील १२ पैकी नऊ पॅकेजेसची कामे वेगाने सुरू असून, उर्वरित तीन पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. या तिन्ही पॅकेजेसची निविदा प्रक्रिया पुढील मे महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात येतील, तर ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे प्रस्तावित आहे.
रोहित ज्या पद्धतीने मुद्दे मांडतोय त्याची काळजी वाटते, सुप्रिया सुळेंकडून सुरक्षेची मागणी
