• Wed. Mar 11th, 2026

    शिमग्याला कोकणात जाणं होणार सोपं, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून; कसं असेल वेळापत्रत?

    शिमग्याला कोकणात जाणं होणार सोपं, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी 1 मार्चपासून; कसं असेल वेळापत्रत?

    Konkan Ro-Ro Ferry: मुंबईतून शिमग्याला कोकणात जाणऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-कोकण रो-रो फेरीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 1 मार्चपासून ही फेरी सुरु होणार असून वेळापत्रकही जाहीर झालं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतिक्षित बोटसेवा अखेर १ मार्चपासून सुरू होत आहे. या सेवेमुळे केवळ प्रवाशांची सोयच होणार नाही, तर सागरी पर्यटनालाही नवी दिशा मिळणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी एम२एम कंपनीच्या बोटीचे पहिले तिकीट बुक करून या सेवेचा शुभारंभ केला. कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी मंत्री राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते, ज्याला आता यश आले आहे.

    कसे असेल वेळापत्रक?

    १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली बोट विजयदुर्गसाठी रवाना होईल आणि दुपारी ३ वाजता तिथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटणारी बोट सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. मार्च महिन्यात या मार्गावर बोटीच्या एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत. मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी बोटी धावतील, तर विजयदुर्ग ते मुंबई या मार्गावर ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च रोजी बोट उपलब्ध असेल.Maharashtra TimesKonkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता जलमार्गे, रो-रो फेरीमुळे 5-6 तासांत प्रवास; कुठून-कशी, किती असतील तिकिट दर?

    यापूर्वी मुंबई ते कोकण अशी जलवाहतूक सुरू होती, पण एका दुर्दैवी जहाजाच्या अपघातानंतर ती बंद पडली होती. बंदर विकास खात्याची जबाबदारी नीतेश राणे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे या जलप्रवासी सेवेसाठी पाठपुरावा केला. जर या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला, तर कोकणातील पर्यटन क्षेत्राला निश्चितच नव्याने चालना मिळेल. या सेवेमुळे प्रवाशांना आरामदायी आणि निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेता येईल. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना कोकणाच्या सुंदर किनारपट्टीचा अनुभव घेण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरेल.

    Maharashtra TimesMumbai Monorail: मुंबईत पुन्हा धावणार ‘मोनोरेल’! MMRDAची मोठी घोषणा; अधिक सुरक्षित व वेगवान मोनो कधी सुरू होणार?

    मुंबई-विजयदुर्ग रो-रोचे तिकिट दर?

    मुंबई- विजयदुर्ग प्रस्तावित तिकिट दर असे असतील, इकॉनॉमी : 2,500 रु.; प्रिमीयम इकॉनॉमी : 4,000 ; दुचाकी वाहन : 1,000 रु.; सायकल : 600 रु.; चारचाकी : 6,000 रु.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा