• Mon. Sep 7th, 2026
RSS मानहानी प्रकरणी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी, काय घडलं?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोर्टात येण्यापूर्वी मुलुंड टोलनाक्याजवळून राहुल गांधी यांचा ताफा जात असताना भाजपच्या कार्यकर्त्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. भिवंडी न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू असून या खटल्यातील एक महत्वाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी न्यायालयात उपस्थिती लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed