नांदेडमध्ये एक 21 वर्षीय आई आपल्या 10 दिवसांच्या बाळाला घेऊन बारावीची परीक्षा देत आहे. तिची शिक्षणासाठी आणि बाळासाठीची धावपळ पाहून परीक्षा केंद्रावर मातृस्नेह कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : जिथे सर्व शब्द गळून पडतात अशी व्यक्ती म्हणजे आई. आई मुलांसाठी सारं काही असते. मुलांचं अस्तित्वच आई असते. अशाच एका आईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या आईचं खूप कौतुक होत आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. बारावी बोर्डाची परीक्षा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. १० फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात देखील झाली आहे. जीवनातातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बोर्डाच्या परीक्षे दरम्यान विवाहित महिला शिक्षणाचा ध्येय पूर्ण करत आपल्या १० दिवसाच्या तान्हुल्या बाळाला घेऊन परिक्षा देत आहे. तिची शिक्षणाची धडपड पाहून या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मातृस्नेह कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शितल चंद्रकांत चित्ते (२१) असे या मातेचे नाव आहे.
शितल चित्ते या नांदेड शहरातील श्री बसवेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. शितल चित्ते यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असला तरी त्यांनी शिक्षण पुढे चालू ठेवले. त्यांनी बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, त्यांना घरच्यांनीही साथ देत प्रोत्साहन दिल्यामुळे त्या आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांचे पती नोकरीवर जात असल्याने बाळाचा सांभाळ करायला घरी कुणीच नाही.
दुसरीकडे, बारावी बोर्ड परीक्षेचा पेपरही महत्त्वाचा आहे. आईची माया आणि तिला शिक्षणाची असणारी गोडी पाहून परीक्षा केंद्रावर उपस्थित भारावून गेले आहेत. त्यांची ही धडपड पाहून केंद्रावर मातृस्नेह कक्षाची स्थापना करण्यात आली. दरम्यान, परीक्षा केंद्राला माध्यमिक शिक्षणधिकारी माधव सलगर, डायटचे प्राचार्य डॉ अमोल निळेकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी भेटी दिल्या. केंद्रप्रमुख प्रा. विजय कदम, सहकेंद्रप्रमुख प्रा. जी. डी. ताडोड, प्रा. विनोद चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून परीक्षा अत्यंत सुरळीत चालू आहेत.
कक्षात करण्यात आली झुल्याची व्यवस्था
शितल चित्ते या बाळ 2 दिवसाचे असल्यापासून आपल्या बाळाला घेऊन बहिणीसोबत त्या केंद्रावर परिक्षा देत आहे. परीक्षा केंद्रावरील मातृस्नेही या कक्षात बाळासाठी झुल्याची व्यवस्था करण्यात आली. बाळाला झुल्यात झोपवून त्या पेपर देत आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा