Pune Weather 18 February 2026: पुण्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत. रात्री आणि पहाटेच्या तापमानातही वाढ झाली असून सरासरीपेक्षा 5.5 अंश सेल्सिअस जास्त नोंदवलं गेलं आहे. पुढील दोन दिवस कसं राहील हवामान?
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याची चाहूल
शहरासह आसपासच्या परिसरांत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभर ऊन, तर रात्री आणि पहाटे गारवा असे संमिश्र वातावरण पुणेकर अनुभवत होते. मात्र, मंगळवारी किमान तापमानात वाढ झाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार हे तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंशांनी जास्त होते. दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यात सन २०१६मध्ये १९.५, सन २०१९मध्ये १९.२ आणि सन २०२४ मध्ये १८.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. यंदा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच किमान तापमानाने १८ अंशांचा टप्पा ओलांडला असल्याचे चित्र आहे.
ST Bus: स्वारगेट बस स्थानाकत महिलेवर अत्याचार, एका वर्षानंतर महामंडळाला आली जाग; आता 7000 सीसीटीव्ही बसवणार; कुठे?
पुढील दोन दिवस कसं असेल तापमान?
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, मंगळवारी शहरात शिवाजीनगर येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल आणि १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमान, लोहगाव येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमान ३३-३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअस दरम्यान असेल, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे.
‘फेब्रुवारी महिन्यात कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने बदल होणे सामान्य आहे. हवेतील आर्द्रता सध्या वाढली असून, सोमवारी रात्री काहीसे ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम मंगळवारी किमान तापमानावर झाला होता’, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचा वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी दिली आहे.
Mumbai-Pune Expressway: ‘पुणे-मुंबई एक्सप्रेसवे’वर कोंडीतही टोल वसुली, MSRDC करणार पूर्ण रक्कम परत; कधी-कशी मिळणार?
नाशिमध्ये थंडी गायब
नाशिकमध्ये थंडी गायब झाली असून तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे नाशिककरांना आता थंडीचा अनुभव येत नाहीये. वातावरणातील गारवा कमी झाला असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी तर हे तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. किमान तापमानातही वाढ झाली असून, ते १५.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पहाटे जाणवणारा गारठाही आता कमी झाला आहे.
