अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीचे थैमान सुरूच असून निंबळक शिवारात ७५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. बापू नामदेव शिंदे असे मयत वृद्धाचे नाव असून या घटनेमुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दोन दिवसांच्या कालावधीत निर्घृण वार
या सर्व घटनेप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक अशी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी २ वाजल्यापासून ते शनिवारी (१४ फेब्रुवारी) रात्री १०.४१ या कालावधीत घडली असावी, असा अंदाज बांधला जातो आहे. यामध्ये निंबळक गावच्या शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ ही रक्तरंजित घटना घडली आहे. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण अशा वस्तूने बापु शिंदे यांच्या डोक्यात जोरदार वार केला आहे, हा वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
Crime News: ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या…’; भररस्त्यात विवाहित महिलेला शरीर संबंधांची मागणी; संतापजनक घटनेनंतर दोघांवर गुन्हा दाखल
कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न ; पोलिसांची धावपळ; आरोपीच्या शोधासाठी पथके
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिक नागरिकांची चौकशी सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
दरम्यान, नगर जिल्ह्यात सलग खून, गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून गुन्हेगारांवर लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.
