राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान जयंत पाटलांचं मोठ विधान समोर आलं आहे. त्यांनी आता नेमकं काय म्हटलं आहे? ज्यामुळे शरद पवार गट आता स्वतंत्रपणे वाटचाल करत राहिल असे संकेत मिळत आहेत.
विलीनीकरणाच्या चर्चा..
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरु आहेत. पण त्यावर ठोस असा निर्णय कधी होणार हा एक मोठा प्रश्न आहे. अजित पवार ांच्या अकाली निधनानंतर अनेक दावे करण्यात येत आहेत. त्यांची शेवटची इच्छा होती, की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक झाला पाहिजे त्यासाठी चर्चाही सुरु झाल्या होत्या या सर्व चर्चा राष्ट्रवादी शपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वतः अजित पवार यांच्यामध्ये सुरु होत्या, असं शप गटाचे अनेक नेते सांगत आहेत. पण त्यानंतरही पक्षाच्या विलीनीकरणावर अजित पवार गटाचे नेते किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका अद्यापपर्यंततरी घेतलेली नाही.
जयंत पाटील म्हणाले…
‘उद्या राजकारणात काय होईल हे आज सांगता येत नाही, अजित दादांच्या अशा निधनानंतर हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजचा दिवस उद्याही आहे का, हे नियतीलाही मान्य आहे का’, असं पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मला विलीनीकरणावर चर्चा करु वाटत नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाचे नेतृत्व शरद पवार करतात. आमचा पक्ष थांबला नाही आहे. आमच्या पक्षाची वाटचालही सुरु आहे. आमची सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासमोर प्रश्न उभे करण्याची किंवा कोणत्या अडचणी आणण्याची इच्छा नाही.’
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणाने अडचणीत; मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडून आता विभागाला महत्त्वाचे आदेश, म्हणाले…
त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्दयांवर आता शरद पवार गटाकडून ठामपणे नकार देण्यात येत असल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचवेळी स्वतंत्र वाटचाल करण्याचे संकेतही मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मोठा खुलासा
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटल यांनी राष्ट्रवादीच्या मासिकामध्ये नवे भाष्य केले आहे. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व हे अजित पवार करणार होते. यासंबंधी शरद पवार आणि इतर नेत्यांमध्येही एकमत झाल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.
