Chhagan Bhujbal On NCP Merger: नाशिकमध्ये शनिवारी (१४) माध्यमांशी चर्चा करताना भुजबळांनी राष्ट्रवादीच्या विलीकरणासह मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणावरही भाष्य केले.
‘दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक घेऊन चर्चा होईल,आमदार आणि कार्यकर्त्यांशी केल्यावरच विलीकरणाचा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी घाई करण्याचे काही कारण नाही’, असे सांगत, भुजबळांनी सबुरीचा सल्ला दिला. या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार बसल्या आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांचीच निवड करणार आहोत, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
Harshwardhan Sapkal : ‘टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलीकरणाचे ठरले होत, विलीनीकरण लगेच झाले पाहिजे, याला अर्थ नाही. नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना काम करू द्या, असे सांगत विलीनीकरणाचा विषय आमच्यासमोर प्राधान्याचा नाही, असे भुजबळ यांनी म्हटले.राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करतील. एवढे मोठे निर्णय दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करूनच होतील. त्यामुळे विलीनीकरणासाठी घाई करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत भुजबळ यांनी मांडले.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी केला तर, घाई केली अशी टीका करण्यात आली. आता विलीनीकरणाचीही घाई कशाला करता, असा टोला भुजबळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना लगावला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या खासदारकीबाबत महाविकास आघाडीतल्या नेते निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत पवार कुटूंबीयांना माहिती होती, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला.
दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने शेतकरी महिलेचा मृत्यू; पतीला वाचविताना ओढावलं संकट, नाशिक हळहळलं
झिरवाळ प्रकरणात पोलिस चौकशी करतील
राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर झिरवाळही अडचणीत आले असून, यावरही भुजबळ यांनी भाष्य केले. सदरचे लाच प्रकरण आता पोलिसांकडे गेले आहे. पोलिस याची सखोल चौकशी करतील. गृहविभाग, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यात किती तथ्य आहे, याची माहिती घेतील. त्यानंतर निष्कर्षाप्रत येता येईल, असेही भुजबळ म्हणाले. दोषी आढळलो तर राजीनामा देतो, असे सांगण्यात काहीच चूक नाही. मंत्रालयात अनेक लोक काम करीत असतात. त्यात कोणी काय केले, त्याचा कोणाशी संबंध होता, हे पोलिस तपासात उघड होईल, असेही ते म्हणाले.
