• Fri. Mar 6th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी बातमी: ‘हे झाले 14 लाख…’ पोलीस निरीक्षकाच्या कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल, पोलीस खात्यात खळबळ

    Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी बातमी: ‘हे झाले 14 लाख…’ पोलीस निरीक्षकाच्या कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल, पोलीस खात्यात खळबळ

    पोलीस निरीक्षकाच्या रायटरने घेतली १४ लाखांची लाच, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल,पोलीस निरीक्षकावर कारवाई, रायटर निलंबित

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. शहरातील ऐतिहासिक लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर कारवाई टाळण्यासाठी तब्बल १४ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तातडीने मोठी कारवाई केली आहे.

    नेमका प्रकार काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या लेणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. या बेकायदेशीर कामावर डोळेझाक करण्यासाठी आणि संबंधित माफियावर कारवाई न करण्यासाठी एका पोलीस निरीक्षकाने आपल्या रायटरच्या माध्यमातून १४ लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नोटांच्या मोठ्या थप्प्या मोजताना स्पष्टपणे दिसत असून, ही व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे.Maharashtra TimesTelangana Politics: भाजपला पळवापळवीची भीती, उमेदवार थेट महाराष्ट्रात शिफ्ट; ‘त्या’ निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल

    व्हिडिओने खळबळ

    हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खाकी वर्दीतील भ्रष्टाचाराचा हा प्रकार इतक्या उघडपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याने सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडिओची सत्यता अद्याप सिद्ध व्हायची असली तरी, प्राथमिक स्वरूपात हा प्रकार गंभीर मानला जात आहे. यामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

    Maharashtra TimesBeed News: 24 वर्षांची देशसेवा, कर्तव्यावर असतानाच ‘वीरपुत्रा’ची प्राणज्योत मालवली; सहा वर्षांच्या चिमुकल्याने दिला वीर पित्याला मुखाग्नी

    प्रशासनाकडून कारवाई

    या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी तातडीने पावले उचलली आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाशी नाव जोडले गेलेल्या पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

    या घटनेमुळे चर्चेला उधाण आले असून, अवैध उत्खननाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा