• Fri. Mar 6th, 2026

    Nagpur Crime : नोकरीचं आमिष देणाऱ्यांपासून सावधान! नागपुरात केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगून 2 कोटींचा गंडा

    Nagpur Crime : नोकरीचं आमिष देणाऱ्यांपासून सावधान! नागपुरात केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगून 2 कोटींचा गंडा

    सरकारी नोकरीचं आमिष देणाऱ्यांपासून सावध राहायला हवं. अन्यथा अशा आमिषांना बळू पडून लाखो रुपये वाया जावू शकतात. नागपुरात तर तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक यामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : सरकारी नोकरी लावून देतो असं सांगून पैसे मागण्यांपासून सावध राहणं आवश्यक आहे. कारण नोकरीच्या नावाने लाखो रुपयांची मागणी केली जाते. पण पैसे घेतल्यानंतर आरोपी फरार होता. ते पीडित कुटुंबाचे फोन घेण्यास टाळाटाळ करतात, उडवाउडवीचे उत्तरे देतात. अखेर पीडित कुटुंबाचे पैसे देखील बुडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहण्याचं आवाहन केलं जातं. पण असं असलं तरी काहीजण अशा आमिषांना बळी पडतात. नागपुरात अशीच एक घटना समोर आली आहे.

    केंद्र सरकारच्या विभागात नोकरी, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 2 कोटींना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी चार ठकबाजांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रामचंद्र मेहपत पाटील (वय ३६) , देवेंद्र भार्गव (वय ५५), शिवम संतोषकुमार सेन (वय ३५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजांची नावे आहेत. नामदेव विश्वनाथ कडू (वय ६४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नामदेव कडू यांची शेजाऱ्याच्या मार्फत रामचंद्र पाटील याच्यासोबत ओळख झाली. मी केंद्रीय मंत्रालयातील पीएचा साहाय्यक असल्याचे पाटील याने नामदेव कडू यांना सांगितले. त्यानंतर त्याने भार्गव हा केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगितले. भार्गव हा केंद्रीय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेल्वे, प्राप्तिकर, पुरातत्त्व विभाग, नीती आयोग, एफसीआय आदींमध्ये नोकरी लावून देतो. यासह अन्य जण गॅस एजन्सी, वेअर हाऊस आणि पेट्रोल पंपाचे मिळवून देतात, असे पाटील याने कडू यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

    नामदेव कडू यांनी मुलगा आणि मुलीला नोकरी लावून देण्यासाठी पाटील आणि त्याच्या साथीदारांना वेळोवेळी ७५ लाख रुपये दिले. तसेच त्यांच्या नातेवाइकांनीही ठकबाजांना पैसे दिले. त्यांनी पाटील आणि त्याच्या साथीदारांना १ कोटी ९४ लाख ७४ हजार ६०० रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही पाटील आणि त्याच्या साथीदारांनी नोकरी लावून दिली नाही. एजन्सीही मिळवून दिली नाही आणि पैसेही हडपले. फसवणूक झाल्याने कडू यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा