• Sat. Jul 4th, 2026

    रोहित पवारांनी संशय घेतलेल्या VSR च्या विमानाने पूर्वी केलेला प्रवास

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2026
    रोहित पवारांनी संशय घेतलेल्या VSR च्या विमानाने पूर्वी केलेला प्रवास
    मुंबई
     महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी असताना दिग्गज नेते अजित पवार यांचं बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर अजितदादांचा अपघात झाला की घातपात, अशा शंकांचं मोहोळ उठलं. अपघातग्रस्त विमानाची मालकी असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या कारभाराविषयी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसंच अजित पवार यांचा घातपात झाल्याचीही शंका त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली होती. अशातच रोहित पवार यांनीही व्हीएसआर कंपनीच्या विमानाने यापूर्वी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

    रोहित पवारांनीही केलेला व्हीएसआरच्या विमानाने प्रवास

    आमदार रोहित पवार यांनी काही कालावधीपूर्वी व्हीएसआर कंपनीच्या चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता. व्हीएसआर कंपनीच्या कारभाराविषयी आणि अजित पवार यांचा घातपात झाल्याची शंका उपस्थित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्यासह रोहित पवार यांनी चार्टर विमान प्रवास केला होता.

    रोहित शर्मासह मुंबई-बारामती विमान प्रवास

    मुंबई ते बारामती दरम्यानच व्हीएसआर कंपनीची चार्टर विमान सेवा रोहित पवार यांनी वापरल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाच्या माजी कर्णधारासह रोहित पवार बारामतीत एका कार्यक्रमाला आले होते. कंपनीच्या कारभाराविषयी रोहित पवार आता नवनवीन शंका उपस्थित करत असतात ही माहिती उघड झाली आहे.

    रोहित शर्माचा बारामती-राशिन दौरा

    रोहित शर्माने ऑक्टोबर २०२४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राशीन (कर्जत-जामखेड) येथे क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा दौरा झाला होता. त्यावेळी रोहित शर्माने मराठीत भाषण करत चाहत्यांची मनं जिंकली होती. ‘माझं मराठी चांगलं नाही’ म्हणत सुरुवात रोहित शर्माने भाषणाला सुरुवात केली, पण पुढचा बुमराह-जयस्वाल नगरमधूनच येईल अशी आशा व्यक्त करत ‘बोलंदाजी’ने उपस्थितांना भारावून टाकलं. हिटमॅनने जागतिक विजेतेपद आणि ग्रामीण भागातील क्रीडा सुविधांच्या महत्त्वावरही भाष्य केलं होतं.

    माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम – महासंवाद
    पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण – महासंवाद
    दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed