• Sat. Jul 4th, 2026

    संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाच्या कार्यालयाला काळं फासलं

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2026
    संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाच्या कार्यालयाला काळं फासलं

    पुणे -प्रतिनिधी

    पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या कार्यालयाला काळं फासलं असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कार्यकर्यांनी पक्ष कार्यालयाच्या दरवाजांवर आणि भींतींवर काळ्या रंगाच्या स्पे ने काळं फासलं आहे. यावेली कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. हे काळं का फासलं याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    स्वराज्य पक्षाच्या पुण्यातील ऑफिसला काळं फासलं

    समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या पुण्यातील ऑफिसला काळं फासण्यात आलं आहे. विविध समस्यांबाबत उत्तरे दिली जात नसल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध व्यक्त केला आणि कार्यालयाला काळं फासलं. त्यामुळे आता स्वराज्य पक्षाच्या पुण्यातील कार्यालयात मोठा गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी 12 मे 2022 रोजी ‘स्वराज्य संघटना’ या सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. ही संघटना शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पाच प्रमुख मुद्द्यांवर काम करते. संभाजीराजे यांनी या माध्यमातून महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. 2024 मध्ये निवडणूक आयोगाने या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पक्षाकडून अनेक उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र या पक्षाला निवडणुकीत फारसा प्रभाव पाडला आलेला नाही.

    छत्रपती संभाजीराजे कोण आहेत?

    संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी झाला. ते ज्यांनी भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून काम केले आहे . ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे थेट वंशज आणि कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू यांचे पणतू म्हणून कोल्हापूर राजघराण्याचे वारस आहेत . 11 जून 2016 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले होते. 12 मे 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेला 2024 मध्ये राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. ते राजकारणासह इतरही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात.

    माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम – महासंवाद
    पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण – महासंवाद
    दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा – मंत्री अतुल सावे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed