मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे घाट परिसराला आज, उद्या आणि परवा अशा तीन दिवसांसाठी, तर रायगड, नाशिक घाटपरिसराला आज आणि उद्या, तसंच मुंबई, ठाणे, पालघर आणि सातारा घाट परिसरात उद्या आणि परवासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज दुपारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसंच तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना , ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना , ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसाची कशी आहे स्थिती?
नैऋत्य मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये आणि राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये आणखी प्रगती केली असून नैऋत्य मान्सून उत्तर कोकण, गुजरात प्रदेश, सौराष्ट्र-कच्छ या भागांत सक्रिय आहे. कोकणातील बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा